मुख्य बातमी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे मानवी हक्क दिन कार्यक्रम 

रत्नागिरी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे आज सकाळी ११ वाजता मानवी हक्क दिन कार्यक्रम संपन्न झाला.

समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रास तसेच संविधानाच्या उद्देशिकेस अभिवादन करून मानवी हक्क दिनाचे महत्व विशद केले. मानवी हक्काचा वैयक्तिक तसेच सामाजिक जीवनामध्ये कसा उपयोग होतो याबाबत यथोचित मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन संकुलातील सर्व कार्यालयातील, विविध आर्थिक विकास महामंडळातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button