रत्नागिरी जिल्हा माध्यमिक पतसंस्थेच्या दापोली शाखेकडून विद्यार्थ्यांचा गुणगौरव
गटशिक्षणाधिकारी श्री. बळवंतराव यांची उपस्थिती

दापोली : विद्यार्थ्यांचे कौतुक केले पाहिजे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून विद्यार्थ्यांचे कौतुक करणारा पतपेढीचा हा उपक्रम खूप चांगला आहे. त्याचबरोबर पतपेढीचा पारदर्शक कारभार चाललेला आहे हे सभासदांकडून ऐकायला मिळते. त्यामुळे सर्व संचालकाच्या अभिनंदन, अशा शब्दांत तालुक्याचे गटशिक्षणअधिकारी श्री. बळवंतराव यांनी कौतुक केले.
रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतपेढी मर्यादित रत्नागिरी शाखा दापोली वतीने सभासद प्रशिक्षण कार्यक्रम व विद्यार्थी गुणगौरव सोहळा २२ डिसेंबर रोजी आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. हा कार्यक्रम शहरातील राधाकृष्ण मंदिर येथे झाला. तालुक्यातील ४३ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव यावेळी करण्यात आला.

या गुणगौरव सोहळ्याला रत्नागिरी जिल्हा माध्यमिक सेवक सहकारी पतसंस्था चेअरमन सागर पाटील ज्ञानदीप शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक व पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन किशोर नागरगोजे व सर्व संचालक, मुरुड हायस्कूल शिक्षक व दापोली शाखा संचालक बिपीन मोहीते, माध्यमिक उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष अयुब मुल्ला, राज्य मुख्याध्यापक महामंडाळाचे राज्य कोषाध्यक्ष संदेश राऊत, पतपेढीचे माजी व्हाईस चेअरमन गिरीष पाटील, सचिव टिडीएफ रोहीत जाधव, तज्ञ संचालक संतोष हजारे, आकाराम महिंद यांच्यासह सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व संघटनाचे पदाधिकारी उपस्थित सर्व गुणवंत विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
सूत्रसंचालन मुरुड हायस्कूलचे श्री. नरवणकर यांनी केले. आभार तज्ञ संचालक श्री. महिंद यांनी मानले.



