जायंट्स वेलफेअर फाउंडेशन फेडरेशन २ ड च्या अध्यक्षपदी गजानन गिडिये

रत्नागिरी : कोकण स्थिथ, जायंट्स वेलफेअर फाउंडेशन, फेडरेशन २ड च्या सन २०२५ च्या अध्यक्षपदी गजानन गिडिये यांची नियुक्ती जायंट्स विश्व अध्यक्षा शायना एन.सी यांनी केली होती. सन २०२५ सालच्या फेडरेशन अध्यक्ष आणि त्यांचे सर्व १६ कौन्सिल सदस्य यांचा शपथविधी आणि पदग्रहण सोहळा नुकताच रत्नागिरीतील पाटीदार भवन येथे उत्साहात झाला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि जायंट्स प्रार्थनेने झाली. या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून जायंट्सचे केंद्रीय समिती सदस्य डॉ. सतीश बापट आणि ॲड. विलास पवार हे उपस्थित होते. तसेच विशेष समिती सदस्य डॉ. मिलिंद सावंत, संजय पाटणकर, माजी अध्यक्ष विनायक राऊत, भूषण मुळ्ये यांच्या उपस्थितीत हा शपथविधीचा सभारंभ पार पडला.
या कार्यक्रमामध्ये निवेंडी प्राईड या नूतन ग्रुपच्या अध्यक्ष आणि सर्व सदस्यांना देखील शपथ देण्यात आली. तसेच रत्नागिरीमधील सहा ग्रुप्सचे अध्यक्ष आणि त्यांचे कार्यकारिणी सदस्य यांना देखील शपथ देण्यात आली. या कार्यक्रमामध्ये सन २०२४ साली उत्कृष्ट सामाजिक काम केलेले तीन ग्रुप रत्नागिरी, रत्नागिरी सिटी सहेली आणि कुवारबाव सहेली यांना रोख रक्कम आणि प्रशस्त्रीपत्रक देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार फेडरेशन उपाध्यक्षा सौ. माधुरी कांबळे यांनी मानले.



