मुख्य बातमी

जिल्ह्यात मधुमेह, कर्करोग व रक्तदाब तपासणीसाठी विशेष मोहीम

रत्नागिरी : असांसार्गिक आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आरोग्य विभागामार्फत  जिल्ह्यातील ३० वर्षांवरील सर्व व्यक्तींची मधुमेह, उच्चरक्तदाब व कर्करोग (मुख, स्तन व गर्भाशय मुख कर्करोग) बाबत तपासणी मोहीम ३१ मार्च २०२५ पर्यंत राबविण्यात येणार आहे.

रत्नागिरीचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आयुष्यमान आरोग्य मंदिर, शहरी आरोग्य वर्धिनी केंद्र, हिंदुहृदय सम्राट बाळसाहेब ठाकरे आपला दवाखाना, प्राथामिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय , महिला रुग्णालय, उपजिल्हा व जिल्हा रुग्णालय यांसारख्या आरोग्य संस्थामध्ये येणाऱ्या ३० वर्षांवरील व्यक्तींची  तपासणी केली जात आहे.

या मोहिमेतंर्गत असंसर्गजन्य रोगाविषयी जनजागृती करण्यासाठी आरोग्यसेविका आणि आशांमार्फत सर्वेक्षण व तपासणी केली जात आहे. या मोहिमेअंतर्गत कर्मचाऱ्यांना तपासणी व निदान करण्यासाठी लागणाऱ्या साधनसामुग्री, बीपी मॉनिटर, ग्लुकोमीटर, औषधे व इतर आवश्यक वस्तुची उपलब्धता करून देण्यात आलेली आहे. सर्व वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांना मोहिमेबाबत सर्व जबाबदाऱ्या  व सूचना देण्यात आलेल्या आहेत.

३० वर्षांवरील व्यक्तींना मधुमेह, उच्चरक्तदाब व कर्करोग (मुख, स्तन व गर्भाशय मुख कर्करोग) यासारखे असांसर्गिक आजार होण्याची जास्त शक्यता असते. या मोहिमेअंतर्गत ३० वर्षांवरील सर्व (पुरुष व महिला) व्यक्तींनी जवळच्या शासकीय संस्थेत जाऊन तपासणी करून घ्यावी आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button