रत्नागिरी जिल्हा वृत्तशैक्षणिक

नवनिर्माण महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी

नवनिर्माण महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी

संगमेश्वर : संगमेश्वर येथील नवनिर्माण महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने ढोल ताशे यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. प्राचार्य डॉ संजना चव्हाण नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ प्रज्ञा कदम तसेच प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थ्यांनी या मिरवणुकीमध्ये सहभाग नोंदवला. शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी प्राचार्य रूपाली अणेराव यांनी केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी पोवाडा सादर केले. शाहिराच्या भूमिकेत,तेजस पानगले आणि मावळ्यांच्या भूमिकेत

सुदीप मुंडे, ऋतिक कळंबटे यांच्यासह साक्षी बोबले, नियती साबळे, सिद्धेश कापले, वेदांत घेवडे या विद्यार्थ्यांनी पोवाडा सादर केला. सिद्धेश कापले आणि वेदांत घेवडे यांनी सदर कार्यक्रमाला संगीत साद आणि ढोलकीने रंगत आणली

विद्यार्थी मनोगत मध्ये भक्ती राऊत ,श्रेया जाधव, निवळकर यांनी मनोगत व्यक्त केली, .सूत्रसंचालन ईशा शेरे हिने केले तर आभार क्षितिजा चिचकर हिने मानले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button