मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा वृत्तराजकीय
राष्ट्रवादी पक्षाची (अजित पवार) २१ ला चिपळुणात बैठक

चिपळूण : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीची बैठक २१ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता चिपळूण येथील माटे सभागृहात होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, आमदार शेखर निकम मार्गदर्शन करणार आहेत.
जिल्ह्यातील सर्व कार्यकारिणी पदाधिकारी, सदस्य, सेलचे पदाधिकारी यांच्याशी चर्चा विनिमय करणार आहेत. सर्वांनी या बैठकीला वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांनी केले आहे.



