क्रीडारत्नागिरी जिल्हा वृत्त

नवनिर्माण संगमेश्वर च्या कबड्डी संघाने कबड्डी स्पर्धेमध्ये मारली बाजी

नवनिर्माण संगमेश्वर च्या कबड्डी संघाने कबड्डी स्पर्धेमध्ये मारली बाजी

संगमेश्वर :  स्वयंभू श्री जाकादेवी मंडळाच्या वतीने आयोजित भव्य दिव्य नाईट कबड्डी स्पर्धेमध्ये नवनिर्माण महाविद्यालय संगमेश्वर कबड्डी संघाने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे

कावडी पिलकेवाडी समाज मंदिर येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती .या स्पर्धेमध्ये नवनिर्माण महाविद्यालय संगमेश्वर च्या विद्यार्थ्यांनी आपला संघ नोंदवत सहभाग घेतला होता. यामध्ये त्यांनी प्रथम क्रमांक पटकावलेला आहे भव्य चषक आणि सहा हजार रुपये रोख स्पर्धेचे बक्षिसाची स्वरूप होते तर दुसरा क्रमांक लांजा संघाने पटकावला नवनिर्माण महाविद्यालयातील कबड्डी संघाचे प्राचार्य डॉ संजना चव्हाण तसेच प्राध्यापक वर्ग यांनी अभिनंदन केले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button