मुख्य बातमी
ग्रामीण डाक सेवक पदासाठी ३ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

रत्नागिरी : ग्रामीण डाक सेवक पद भरतीसाठी ३ मार्चपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन रत्नागिरीचे डाकघर अधीक्षक यांनी केले आहे.
रत्नागिरी टपाल विभागातील ग्रामीण डाक सेवकांची एकूण ९५ रिक्त पदे विविध प्रवर्गातून भरण्यात येणार आहेत. या पद भरतीसाठीची प्रक्रिया १० फेब्रुवारीपासून ऑनलाईन सुरू झाली असून, उमेदवरांनी https://indiapostgdsonline.gov.in या संकेतस्थळाला भेट देवून ३ मार्चपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन डाकघर अधीक्षक यांनी केले आहे.



