नवनिर्माण कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटतर्फे आयोजित “तंदुरी नाईट्स २.०”ला अभूतपूर्व प्रतिसाद

रत्नागिरी : येथील नवनिर्माण शिक्षण संस्था संचलित एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाच्या हॉटेल मॅनेजमेंट विभागातर्फे आयोजित केलेल्या “तंदुरी नाईट्स २.०” या दोन दिवसीय खाद्य महोत्सवाला रत्नागिरीकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. या खाद्य महोत्सवात अनेक प्रकारच्या आंतरराष्ट्रीय पदार्थांचा समावेश होता. हे सर्वच पदार्थ रत्नागिरी करांच्या पसंतीस उतरले. उपस्थितांनी हॉटेल मॅनेजमेंट विभागाचे आणि विद्यार्थ्यांचे तोंड भरून कौतुक केले.

नवनिर्माण शिक्षण संस्थेतील मोहन खातू क्रीडा संकुल येथे हा खाद्य महोत्सव आयोजित केला होता. “तंदुरी नाईट्स २.०” या खाद्य महोत्सवात द सॅंडविच स्टेशन, मोमो एक्सप्रेस, होम ऑफ बिर्याणी, चिप्स अँड चॅट, कॉम्बो ट्रीट, स्पार्कलिंग स्प्रित्ज स्टेशन, तंदुरी खजाना, चिली ब्लिस असे स्टॉल्स उभारण्यात आले होते. या सर्वच स्टॉल्सवर एकच खवय्यांनी गर्दी केली होती. वेगवेगळे पदार्थ चाखण्याबरोबरच अनेकांनी कॉम्बो पॅकलाही पसंती दिली.

दरम्यान, दोन दिवस आलेल्या एखाद्या महोत्सवाला हजारो रत्नागिरीकरांनी भेट दिली. हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी हॉटेल मॅनेजमेंट विभागाचे प्रमुख प्रा. ताराचंद ढोबळे आणि हॉटेल मॅनेजमेंटच्या सर्व विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली.




