हातखंबा येथे नवीन कायदा अंमलबजावणीसंदर्भात तालुकास्तरीय कार्यशाळा

रत्नागिरी : ग्रामीण पोलीस ठाणेअंतर्गत केंद्र शासन नवीन कायदा अंमलबजावणी अनुषंगाने तालुक्यातील हातखंबा येथील श्री सिद्धगिरी मंगल कार्यालय येथे तालुकास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली.
या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून रत्नागिरी पोलीस ठाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईनकर यांनी २०२३ मध्ये नव्याने अस्तित्वात आलेल्या भारतीय न्याय संहिता २०२३, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ आणि भारतीय साक्ष कायदा २०२३ यांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
श्री. पाटील सो (prob.IPS) यांच्यासह जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अमित वायकुळ, पांडुरंग नंदिवाले, ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र यादव यांनी कायदा सुव्यवस्था, महिला अत्याचार, पोक्सो कायदा अनुषंगाने सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला हातखंबा गाव ग्रामपंचायत सदस्य, व्यापारी संघटना पदाधिकारी, अंगणवाडी सेविका, मदतनिस, ग्रामस्थ व पोलीस पाटील असे सुमारे १२० प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.



