मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा वृत्तशैक्षणिक

कडवई येथे स्काऊट गाईड जिल्हा मेळावा दिग्गजांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न 

रत्नागिरी : जिल्ह्याचा स्काऊट गाईड मेळावा कडवई (ता. संगमेश्वर) येथील द एज्युकेशन सोसायटीच्या भव्य प्रांगणात दिग्गजांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यात सुमारे २० शाळांतील ४०० स्काऊट सहभागी झाले होते.

दि. ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या जिल्हा मेळाव्याचे उद्‌घाटन संममेश्वर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी कडवई एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सादीक काझी, उपाध्यक्ष अन्सार जुवळे सामाजिक कार्यकर्ते युयुत्स आर्ते, चेअरमन जमातूल मुस्लमीन कडवई सिकंदर जुवळे, व्हाईस चेअरमन अफसर खान, वैद्यकीय अधिकारी आसावरी पाटोळे, महाराष्ट्र उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. कारीगर, द इंग्लिश स्कूल कडवईचे मुख्याध्यापक प्रांजल मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.

 

जिल्हा स्काऊट संघटक रमाकांत डिंगणे व सर्व कार्यालयीन कर्मचारी, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त राजेंद्र खांबे, जिल्हा मुख्यालय स्काऊट आयुक्त दिनेश नाचणकर, शिबिराचे स्थळ निर्देशक मिलिंद कडवईकर, जिल्हा मुख्यालय गाईड आयुक्त बेबीताई पाटील, नियोजन समितीचे प्रशांत जाधव तसेच सर्व नियोजन सदस्य उपास्थित होते.

या मेळाव्या दरम्यान चित्रकला, रांगोळी, संचलन, कलर पार्टी, शारीरिक प्रात्यक्षिके, शोभायात्रा आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

 

अंतिम दिनी सर्वधर्मिय प्रार्थनेसह स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी शिववैभव संस्थेचे चेअरमन व माजी जि. प. उपाध्यक्ष संतोष थेराडे यांसह कडवई सरपंच विशाखा कुवळेकर, क्राँग्रेसच्या संगमेश्वर महिला तालुकाध्यक्ष सौ. कडवईकर यांसह गावातील व परिसरातील अनेक मान्यवर व्यक्त होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button