मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा वृत्त

टेरवचे सुधाकर कदम क्षत्रिय मराठा कदम परिवाराच्या राज्यस्तरीय संमेलनात सन्मानित

चिपळूण : तालुक्यातील टेरव गावचे सुपुत्र व सरस्वती कोचिंग क्लासेस, मुंबईचे संचालक सुधाकर कदम यांच्या शैक्षणिक, सामाजिक व धार्मिक कार्याची दखल घेऊन क्षत्रिय मराठा कदम परिवाराच्या राज्यस्तरीय संमेलनात मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, पोपाट कदम लिखित कदम कुळाचा इतिहास हे पुस्तक तसेच श्री क्षेत्र तुळजाभवानी मातेचे कुंकू, प्रसाद व कवड्याची माळ देऊन सन्मानित करण्यात आले.

क्षत्रिय मराठा कदम परिवाराचे ७ वे राज्यस्तरीय कुलसंमेलन नुकतेच जामगे, खेड येथे संपन्न झाले. यावेळी गृहराज्यमंत्री (शहरी) ना. योगेशदादा कदम, आ. बाबुराव कदम, मा. आमदार अनिल कदम, निफाड, महाराष्ट्र केसरी अप्पासाहेब कदम, उद्योजक गजानन कदम, अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे अध्यक्ष प्रा. डॉ. सतीश कदम, शस्त्र संग्राहक सुनील कदम, अमरराजे कदम अध्यक्ष क्षत्रिय मराठा कदम परिवार, (महाराष्ट्र राज्य) व अध्यक्ष श्री तुळजा भवानी भोपे पुजारी मंडळ, तुळजापूर, सचिव रामजी कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच मंचावरील उपस्थित सर्व मान्यवरांना कुलस्वामिनी श्री भवानी वाघजाई मंदिर श्री क्षेत्र टेरव, चिपळूण देवस्थानची दिनदर्शिका व टेबल दिनदर्शिका देवून मंदिरास भेट देण्यासाठी निमंत्रित करण्यात आले. सदर संमेलनास संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच गुजरात व गोवा येथून हजारो क्षत्रिय मराठा कदम बांधव उपस्थित होते. या सन्मानाबद्दल सुधाकर कदम यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button