क्रीडामुख्य बातमी

श्रीलंका येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सिलंबम स्पर्धेसाठी रत्नागिरीच्या गुरुप्रसाद सावंत निवड

राष्ट्रीय सिलंबम स्पर्धेत दोन कांस्यपदकांची कमाई

रत्नागिरी : कन्याकुमारी येथे पार पडलेल्या पहिल्या खुल्या राष्ट्रीय सिलंबम स्पर्धेत महाराष्ट्राच्या २० खेळाडूंनी सहभाग घेत ८ सुवर्ण, १५ रौप्य, तर ११ कांस्यपदकांची कमाई केली. या संघामध्ये रत्नागिरीतील लोकमान्य बाळ गंगाधर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेणारा गुरुप्रसाद मिलिंद सावंत याने दोन कांस्यपदक संपादन केले. गुरुप्रसादने केलेल्या चमकदार कामगिरीमुळे त्याची श्रीलंका येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सिलंबम स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

ही स्पर्धा ३० जानेवारी ते २ फेब्रुवारी या दरम्यान कन्याकुमारीतील (तामिळनाडू) सीएसआय हॉल येथे झाली. लाठी-काठी तलवारबाजी, भाला चालवणे, दांडपट्टा (सुरूल) मडु आदी क्रीडा प्रकारांमध्ये या स्पर्धेमध्ये तामिळनाडू,महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, राजस्थान, हरियाणा, पॉंडिचेरी, छत्तीसगड झारखंड आदी राज्यांतील ४०० खेळाडूंनी सहभाग घेतला.

गुरुप्रसाद सावंतला मुख्य प्रशिक्षक कुंडलिक कचाले यांचे मार्गदर्शन लाभले. गुरुप्रसाद याची श्रीलंका येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सिलंबम स्पर्धेसाठी निवड झाल्याने युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रेनिंग सेंटरचे अध्यक्ष राम कररा, औद्योगिक प्रशिक्षण संस्था रत्नागिरीचे प्राचार्य श्री. कोतवडेकर, गटनिर्देशक सौ. वसुधा पांचाळ त्याचे अभिनंदन करत पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button