मुख्य बातमीशैक्षणिक

नवनिर्माण कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटतर्फे ८, ९ फेब्रुवारी रोजी “तंदुरी नाइट्स”चे आयोजन

रत्नागिरी : येथील नवनिर्माण शिक्षण संस्था संचलित एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाच्या हॉटेल मॅनेजमेंट विभागातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही तंदुरी नाईट्स इव्हेंटचे आयोजन करण्यात आले आहे. हा इव्हेंट शनिवारी (ता. ८) आणि रविवारी (ता. ९) रोजी सायंकाळी ६ ते रात्री १० वेळेत नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या कै. मोहन खातू क्रीडा संकुल, एमआयडीसी मिरजोळे येथे रंगणार आहे. यामध्ये अनोख्या आणि विविध प्रकारच्या खाद्य पदार्थांची चव रत्नागिरीकरांना चाखता येणार आहे.

हे या इव्हेंटचे १२ वे वर्ष आहे. नवनिर्माण कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या वतीने दरवर्षी थीम डिनरचे आयोजन केले जाते. यामध्ये आजपर्यंत महाराष्ट्रीयन, गुजराती, राजस्थानी, हैदराबादी आदी वेगवेगळ्या थीमवर डिनर आयोजित केला आहे. या सर्व थीम डिनरना रत्नागिरीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. यंदाही अशाच प्रकारच्या “तंदुरी नाईट्स” या टीम डिनरचे आयोजन केले आहे.

यामध्ये रत्नागिरीकरांसाठी द सॅंडविच स्टेशन, मोमो एक्सप्रेस, होम ऑफ बिर्याणी, चिप्स अँड चॅट, कॉम्बो ट्रीट, स्पार्कलिंग स्प्रित्ज स्टेशन, तंदुरी खजाना, चिली ब्लिस अशा अनोख्या आणि विविध प्रकारच्या खाद्य पदार्थांची रेलचेल या खाद्य महोत्सवात असणार आहे.

खास रत्नागिरीकरांसाठी आयोजित केलेल्या या खाद्य महोत्सवाचा लाभ रत्नागिरीकरांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये आणि हॉटेल मॅनेजमेंट विभागप्रमुख प्रा. ताराचंद ढोबाळे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button