कोकणनगर येथे जागतिक कर्करोग दिन व जनजागृती मोहिमेचे जिल्हास्तरीय उद्घाटन

रत्नागिरी : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील कोकण नगर येथील नागरी आरोग्य केंद्रात जागतिक कर्करोग दिन तथा कर्करोग तपासणी व जनजागृती कार्यक्रमाचे जिल्हास्तरीय उद्घाटन झाले. हा कार्यक्रम अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केला होता.

यावेळी कर्करोगाची लक्षणे, कारणे व उपचार याबाबत माहिती देऊन आरोग्य विभागाकडून या मोहिमेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कर्करोग जनजागृती होणे गरजेचे असल्याचे डॉ. गावडे यांनी सांगितले.
याप्रसंगी जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुश शिरसाट, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश्वरी सातव, जिल्हा माध्यम अधिकारी एन. जी. बेंडकुळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. रमन, राष्ट्रीय असांसर्गिक आजार नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक डॉ. यश प्रसादे, पर्यवेक्षक कल्याण बिराजदार, आरोग्य सहाय्यक चेतन शेट्ये यांच्यासह सर्व आरोग्य कर्मचारी, आशा व नागरिक उपस्थित होते.
आपले मनोगत व्यक्त करताना श्री. प्रसादे यांनी कर्करोग मोहिमेबद्दल तसेच डॉ. शिरसाट, डॉ. सातव, डॉ. रमन यांनी कर्करोग आजार व जनजागृतीबाबत माहिती देऊन मार्गदर्शन केले.



