मुख्य बातमी

दापोलीतील ब्रिलियंट करिअर अकॅडमीत शालेय विद्यार्थ्यांसाठी आकाशदर्शन कार्यक्रम

रत्नागिरीतील प्रा. बाबासाहेब सुतार यांची उपस्थिती

दापोली : येथील ब्रिलियंट करियर अकॅडमी येथे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आकाश दर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील प्रा. बाबासाहेब सुतार उपस्थित होते.

या कार्यक्रमात शाळेतील इयत्ता तिसरी ते इयत्ता दहावीमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रा. सुतार यांनी प्रथम पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे विद्यार्थ्यांना आकाश, सूर्यमाला आणि विश्वाची माहिती दिली आणि त्यानंतर शाळेच्या भव्य मैदानावर आधुनिक दुर्बिणीद्वारे मंगळ, गुरू,शनी ह्या ग्रहांच्या निरीक्षणाची संधी दिली. तसेच त्यांनी लेझर पॉइंटरद्वारे प्रत्यक्ष आकाशाची ओळख करून दिली.

१०० पेक्षा अधिक विद्यार्थी आणि पालकांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे प्रशासक कुणाल मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button