भाजपतर्फे प्रभाग क्रमांक ६ मध्ये तिळगुळ समारंभ व मोफत नेत्रदान तपासणी शिबीर

रत्नागिरी : शहरातील प्रभाग क्रमांक ६ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या वतीने तिळगुळ समारंभ तर इंफिगो आणि भाजप यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शेकडो लोकांनी मोफत नेत्रतपासणी शिबिराचा लाभ घेतला. तिळगुळ समारंभाचे आयोजन महिला ओबीसी जिल्हाध्यक्ष सौ. प्राजक्ता रूमडे, युवा मोर्चा पदाधिकारी सौ. निधी नीलेश आखाडे यांनी केले होते. परिसरातील तीनशे पेक्षा अधिक महिलांनी हळदी-कुंकू समारंभाला उपस्थिती दाखवली.

या दोन्ही कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे, प्रदेश पदाधिकारी शिल्पा मराठे, भक्ती दळी, शोनाली आंबेकर, माजी नगरसेविका श्रीमती रसाळ, महिला शहर अध्यक्षा पल्लवी पाटील, शहराध्यक्ष राजेंद्र फाळके, नीलेश आखाडे, दादा ढेकणे, प्रवीण रुमदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



