रत्नागिरीत महागणपतीची प्रतिष्ठापणा
रत्नागिरी गणेशोत्सव मंडळातर्फे आरोग्य मंदिर येथे माघी गणेशोत्सवाचे आयोजन

रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांच्या प्रेरणेतून आणि कुडाळ मालवणचे आमदार नीलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरीमध्ये रत्नागिरी गणेशोत्सव मंडळातर्फे आरोग्य मंदिर येथे माघी गणेशोत्सवानिमित्त ‘रत्नागिरीचा महागणपती’ ची विधिवत प्राणप्रतिष्ठापना झाली.
१ फेब्रुवारी रोजी गणेश जयंतीला सकाळी ‘रत्नागिरीचा महागणपती’ ची प्राणप्रतिष्ठापना योगेश मगदूम आणि सौ. अनघा मगदूम यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी उद्योजक अमित देसाई, मंडळाच्या उपाध्यक्ष अनुष्का शेलार, सचिव प्रवीण लिंगायत, खजिनदार अमोल देसाई, सल्लागार मनोज घडशी, सदस्य राहुल भाटकर, निखिल शेट्ये, रामदास शेलटकर, राजेश झगडे, अमृत गोरे, साईनाथ सावंत, रोहित भुजबळराव, सागर सोलकर, अभिलाष कारेकर, शिवाजी कारेकर, प्रणव सुर्वे, श्रीनाथ सावंत, ययाती शिवलकर, अशोक वाडेकर आदी उपस्थित होते.

सायंकाळी ८ ते १० या कालावधीत फुणगुस येथील बुवा गौरव पांचाळ आणि साई प्रासादिक भजन मंडळाचे भजन होणार आहे. उद्या (२ फेब्रुवारी) सकाळी ११ वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा होणार असून सायंकाळी ४ ते रात्री ९ या वेळेत तीर्थप्रसाद आणि महिलांचा हळदी-कुंकू समारंभ होईल. या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.



