मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा वृत्तसाहित्य-कला
वाटूळ येथे होणाऱ्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला चित्रकला स्पर्धा संपन्न

राजापूर : तालुक्यातील वाटूळ येथे दहावे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन १ आणि २ फेबुवारी दरम्यान होत आहे. या निमित्ताने ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला चित्रकला स्पधेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला वाटुळ गावातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला असून वाटूळ नगरीत होणाऱ्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे प्रतिबिंब या स्पर्धत रेखाटण्यात आलेले आहे.
या स्पर्धेचा परीक्षण सुप्रसिद्ध चित्रकार विजयराज बोधनकर व लांजातील रंगकर्मी किरण बेर्डे करणार असून, या चित्रकलेच्या स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळाले आहे. स्पर्धेतील विजेत्यांना संमेलनाध्यक्ष दिनकर गांगल, भारताचार्य सु. ग. शेवडे, उद्योजक रवींद्र प्रभुदेसाई यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.



