मुख्य बातमी
राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष नौसीन काझी यांच्याकडून तालुकाप्रमुख शेखर घोसाळे यांना शुभेच्छा

रत्नागिरी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रत्नागिरी तालुकाप्रमुख पदी शेखर घोसाळे यांची नियुक्ती करण्यात आली. त्याबद्दल महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष नौसीन काझी यांनी साळवी स्टॉप शिवसेना शहर शाखा क्रमांक १ येथे जाऊन शुभेच्छा दिल्या.
नवनियुक्त तालुकाप्रमुख श्री. घोसाळे यांनी काल (२९ जानेवारी) साळवी स्टॉप येथील शाखेत सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिकांकडून शुभेच्छा स्वीकारल्या. यावेळी सेनेचे शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, विभाग प्रमुख महेश पाटील, श्री. तोडणकर, श्री. देसाई यांच्यासह बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.



