मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा वृत्त

जिल्हातील पंचायत समिती सभापती पदांसाठी आरक्षण जाहीरp

रत्नागिरी– जिल्ह्यातील पंचायत समित्यांमध्ये सत्त समीकरणांना नवी दिशा देणारी सभापती पदांची आरक्षण सोडत आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात काढण्यात आली. जिल्ह्यातील ९ पंचायत समित्यांपैकी ४ जागा सर्वसाधारण गटासाठी, ३ जागा सर्वसाधारण महिलांसाठी, १ जागा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी तर १ जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित ठरल्या आहेत.

मंडणगड, संगमेश्वर आणि लांजा या पंचायत समित्यांमध्ये सर्वसाधारण महिला आरक्षण लागू झाल्याने स्थानिक महिला नेतृत्वास संधी मिळणार आहे. तर रत्नागिरी, चिपळूण, गुहागर आणि खेड येथे सर्वसाधारण (ओपन) गटासाठी आरक्षण जाहीर झाल्याने पुरुष नेत्यांमध्ये चुरस रंगणार आहे. दापोलीत नागरिकांचा मागास प्रवर्ग, तर राजापूरात मागास प्रवर्ग स्त्रीसाठी आरक्षण लागू झाले आहे

ही सोडत लागल्याबरोबरच सर्वच राजकीय पक्षांत गटबाजी, चर्चासत्रं आणि पुढील रणनिती आखण्याची लगबग सुरू झाली आहे. कोणत्या तालुक्यात कोणाला उमेदवारी मिळणार, कुणाचा गट मजबूत होणार आणि कुठे गटफुटीचा फटका बसणार यावर आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

सभापती पदाच्या या आरक्षणामुळे पंचायत समित्यांमध्ये सत्तेची समीकरणं नव्याने मांडली जातील आणि येत्या काही दिवसांत जिल्ह्यातील राजकारणात चांगलीच रंगत दिसणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button