पालकमंत्री उदय सामंत जिल्हा दौऱ्यावर

रत्नागिरी : राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
त्यांचा सविस्तर दौरा असा : २६ जानेवारी रोजी सकाळी ९.१५ वाजता भारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा शासकीय समारंभ (स्थळ : छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, रत्नागिरी ) सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद रत्नागिरीअंतर्गत विविध उपक्रमांचे लोकार्पण व उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती.
१. ग्रामपंचायतींना कचरा संकलनासाठी देण्यात येणाऱ्या ई-कार्टस् लोकार्पण
२. रस्त्यांच्या पृष्ठभागांचा दर्जा ठरविण्यासाठी AI enabled PCI APP चे उद्घाटन
३. प्रायोगिक तत्वावर नळ पाणी पुरवठा योजना IOT Sensor वर आधारित Automatic Remote Monitoring System सुरु करण्याचे उद्घाटन (स्थळ : मुख्य प्रशासकीय इमारत, जि.प., रत्नागिरी), सकाळी ११.३० वाजता मुरलीधर बाग तसेच परिसराचे सुशोभिकरण या विकासकामाच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती (स्थळ : मुरलीधर मंदिर मागील बाजूस खालची आळी), दुपारी १२ वाजता मंथन आर्ट स्कूल रत्नागिरी शाखेच्या नवीन वास्तूच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती (स्थळ : मंथन आर्ट स्कूल पद्मिनी रेसिडेंसी, पहिला मजला, ऑफीस नं ४, पावर हाऊस रोड, नाचणे), दुपारी १२.३० वाजता आरोग्य विभाग PM- ABHIM राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ५० खाटांचे क्रिटीकल केयर युनिट बांधणे या विकासकामाच्या भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : प्रादेशिक मनोरुग्णालय, रत्नागिरी), दुपारी १.३० वाजता रत्नागिरी (मिरजोळे) औद्योगिक क्षेत्रामध्ये विविध समाजाच्या समाज भवनाकरिता दिलेल्या भूखंडांच्या वाटप कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : रॉयल हॉल, एम.आय.डी.सी., मिरजोळे, रत्नागिरी), दुपारी २.३० वाजता रत्नागिरी विमानतळ येथून हेलिकॉप्टरने अहिल्यानगरकडे प्रयाण.



