शिपोशी, भांबेड येथे रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी सेंटरतर्फे आशा सेविकांना मार्गदर्शन

रत्नागिरी : वीरश्री ट्रस्ट आणि धन्वंतरी रुग्णालयातील रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून आशा सेविकांना आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यासाठी लांजा तालुक्यातील शिपोशी आणि भांबेड येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या दोन्ही ठिकाणी १० जानेवारी रोजी हे आशा सेविकांसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

आशा सेविका यांना आरोग्य क्षेत्रातील नवनवीन बदलाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्या माध्यमातून ग्रामीण आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी तसेच त्यातून ग्रामीण भागापर्यंत अत्याधुनिक आरोग्य सेवेबद्दल माहिती पोहोचून त्याचा लाभ सामान्य जनतेला व्हावा, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी भांबेड प्राथमिक आरोग्य केंद्र येथे झालेल्या या शिबिराला वैद्यकीय अधिकारी डॉ. उमा त्रिभुवने, गट प्रवर्तक एस. एस. जाधव, एलएचव्ही एल. ए. ठोसर, आरोग्य सहाय्यक आर. एस. गवळी, एएनसी ए. यू. पाटोळे उपस्थित होते. तर शिपोशी प्राथमिक आरोग्य केंद्रात झालेल्या मार्गदर्शन शिबिरावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. एन. एम. धोने, गटप्रवर्तक नंदिनी चव्हाण, सुपरव्हायझर ए. बी. वाघाटे, डी. बी. डोले तर धन्वंतरी रुग्णालयाकडून श्वेता कदम आणि ऐश्वर्या सिस्टर यावेळी उपस्थित होते.



