मुख्य बातमी

काँग्रेस आणि शेतकरी कष्टकरी संघटनेतर्फे २५ जानेवारी रोजी धरणे आंदोलन 

रत्नागिरी : काँग्रेस आणि शेतकरी – कष्टकरी संघटनेच्या वतीने धरणे अंदोलनाबाबत २२ जानेवारी रोजी संगमेश्वर येथे मारुती मंदिराच्या आवारात मंदिराबाहेर रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि शेतकरी कष्टकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अशोकराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प विस्थापितांची बैठक झाली. या बैठकीत येत्या शनिवारी (२५ जानेवारी) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

यासाठी लागणारी उपविभागीय अधिकारी आणि पोलीस यंत्रणेची मान्यता मिळविण्यात आल्याचे श्री. जाधव यांनी सांगितले. २५ जानेवारी हा दिवस मतदार दिन असतो. त्या दिवशी निवडणूक आयोगाची मनमानी, द्वेषपूर्वक वर्तणूक याविरोधात हे अंदोलन करून प्रशासनाला निवेदन देण्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सूचित केले आहे. त्यानुसार दोन्ही कार्यक्रम संयुक्तरित्या २५ रोजीच एकत्र घेतले जातील, असे श्री. जाधव यांनी सांगितले. त्यावर रत्नागिरी जिल्हातील जिल्हा, प्रांतिक, तालुका, युवक, महिला, एनएसयुआयच्या सर्व नेते कार्यकर्त आणि प्रकल्पबाधित विस्थापित (नॅशनल हायवे)च्या लोकांनी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (नवीन गेट ) मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, आहे असे आवाहन अशोकराव जाधव यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button