मुख्य बातमी
पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

रत्नागिरी : भारताचा ७६ व्या प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ छत्रपती शिवाजी महाराज स्टेडिअम येथे २६ जानेवारी रोजी सकाळी ठिक ९.१५ वाजता उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे.
ध्वजारोहणाच्या वेळी राष्ट्रीय/समारंभीय पोषाख परिधान करण्यात यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केले आहे.



