मुख्य बातमी

इनर व्हील क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनतर्फे फूड फेस्टिवल आणि शॉपिंग कार्निवलचे आयोजन

रत्नागिरी : इनर व्हील क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन यांच्या वतीने “उत्तरायण २०२५” फूड फेस्टिवल आणि शॉपिंग कार्निवलचे आयोजन करण्यात आले आहे. हा फेस्टिवल २४ ते २६ जानेवारी या कालावधीत सकाळी ११ ते रात्री ९ या वेळेत माळनाका येथील जयेश मंगल पार्कमध्ये (थिबा पॅलेस रोड) होणार आहे.

२४ जानेवारी रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम होणार आहे. या फेस्टिवलमध्ये रत्नागिरीकरांना अस्सल चवीच्या खाद्य पदार्थ्यांचा आस्वाद घेता येणार असून, शॉपिंग, फनी गेम्स, सरप्राइज गिफ्ट्स, म्युझिक आणि डान्स याचा आनंद सहकुटुंब लुटता येणार आहे.

सामाजिक उपक्रमांना हातभार लावण्यासाठी या नावीन्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमातून मिळणारा निधी क्लबमार्फत सामाजिक कार्यासाठी वापरला जाणार असल्याची माहिती इनर व्हील क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनच्या डॉ. स्वप्ना करे यांनी दिली.

या फेस्टिवलला जास्तीत जास्त रत्नागिरीकरांनी भेट घेऊन विविध कार्यक्रमांचा आनंद घ्यावा, असे आवाहन इनर व्हील क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनतर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button