मुख्य बातमीशैक्षणिक

नवनिर्माण कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये स्वसंरक्षण आणि सायबर गुन्हेगारीबाबत मार्गदर्शन 

रेझिंग डे निमित्ताने उपनिरीक्षक शंकर नागरगोजे यांची उपस्थिती

संगमेश्वर : तारुण्यात मोबाईलद्वारे वेगवेगळ्या प्रकारे आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर तरुण मुला-मुलींनी सोशल मीडियाचा वापर करताना आपली वैयक्तिक माहिती, फोटो, व्हिडिओ शेअर करण्याचे टाळावे. कारण यामुळे शारीरिक मानसिक किंवा लैंगिक फसवणूक होण्याची शक्यता जास्त असते. सायबर गुन्हेगारीचा छडा लावणे मर्यादित संसाधनांच्या आधारे जवळजवळ अशक्य असते. त्यामुळे पूर्व काळजी घेणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शंकर नागरगोजे यांनी केले.

रेझिंग डे निमित्त संगमेश्वर- लोवले येथील नवनिर्माण कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये स्वसंरक्षण आणि सायबर गुन्हेगारीबाबत माहिती देण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मार्गदर्शन करताना उपनिरीक्षक श्री. नागरगोजे बोलत होते.

यावेळी प्राचार्या डॉ प्रज्ञा कदम, पोलीस बाबुराव कोंडल, कुणाल घोलप, होमगार्ड अभिषेक झेपले, प्रा. प्रशांत जाधव, प्रा. स्नेहल खेराडे, नेहा सरवणकर आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी त्यांनी पोलीस वापरत असलेल्या विविध शस्त्रांविषयी माहिती दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button