क्रीडामुख्य बातमी
दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडेचा मुलीचा संघ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगावला रवाना

रत्नागिरी : राज्यस्तरीय डॉजबॉल स्पर्धेसाठी रत्नागिरी येथून रेल्वेने हा संघ जळगाव येथे रवाना झाला.
संघाला रवाना करण्यासाठी मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे सदस्य अजीज वागळे, उपाध्यक्ष तोफिक चिकटे, सचिव रुमान पारेख, राजेश जाधव रत्नागिरी रेल्वे स्थानक येथे आवर्जून उपस्थित होते. संघाबरोबर श्रीमती जाधव व राजेंद्र कदम रवाना झाले आहेत.
दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडेचा मुलीचा संघ राज्यस्तरीय डॉजबॉल स्पर्धेसाठी जळगाव येथे रात्री रवाना झाला आहेत. त्या संघाला मुस्लिम एज्युकेशन सोसायटीच्या वतीने घुमटकर ग्रुपच्या वतीने तसेच प्रशालेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.



