मुख्य बातमी

मनसेमध्ये महिलांच्या प्रवेशाचा धडाका

रत्नागिरी : काही दिवसांपूर्वी दोन-चार लोकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) सोडचिठ्ठी देण्याला मनसेला खिंडार पडले वगैरे म्हणणाऱ्यांना मनसेच्या जुन्या शिलेदारांनी जोरदार उत्तर दिले आहे. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विकासाच्या मुद्द्यावर प्रभावित होऊन मनसे उपाजिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर यांच्या नेतृत्वाखाली सचिन शिंदे, संपदा राणा व बाबय भटकर यांच्या प्रयत्नाने रत्नागिरी शहरातील अनेक महिलांनी मनसेमध्ये प्रवेश केला.

राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत मांडलेले विकासाचे मुद्दे पाहून विकास हवा असेल, तर मनसेच हवी अशीच भावना घेऊन आपण मनसेमध्ये जाहीर प्रवेश करत असल्याचे या महिलांनी सांगितले. बिस्मिला नदाफ, सानिया नदाफ,मासुमा शेख, चौडावा बडगैर, शमा मुल्ला, मंगल पाथरोट, सायरा नदाफ, समृद्धी सुर्वे, क्रांती सुर्वे रोबर्ट यांच्यासह अनेक महिलांनी मनसेत प्रवेश केला.

या प्रसंगी उपजिल्हाधक्ष अरविंद मालाडकर, कामगार सेना जिल्हाचिटणीस महेंद्र गुळेकर, माजी तालुकाध्यक्ष सचिन शिंदे, बाबय भाटकर, विभाग अध्यक्ष शैलेश मुकादम, महाराष्ट्र सैनिक स्वप्नील सुर्वे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button