मुख्य बातमी

चिपळूणच्या मनसे (प्रभारी) शहराध्यक्षपदी राजेंद्र गोंजारे, तर मनविसे तालुकाध्यक्षपदी गुरू पाटील

खेड : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि पक्षाचे सरचिटणीस आणि कोकणचे नेते वैभव खेडेकर यांच्यावर विश्वास ठेऊन तसेच जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे यांच्या नेतृत्वाखाली मनसेला नव्याने उभारी देण्याचे काम केले आहे. वैभव खेडेकर यांच्या विश्वासाला पात्र ठरून जे पदाधिकारी पक्ष हितासाठी जोमाने प्रयत्न करत होते व या पुढे देखील करणार आहेत. त्यांनी एकत्र येऊन मनसेची ताकत दाखवण्यासाठी चिपळूण तालुक्याच्या काही प्रमुख नवनियुक्या केल्या. यामध्ये मनसे (प्रभारी) शहर अध्यक्षपदी राजेंद्र गोंजारे तर मनविसे तालुका अध्यक्षपदी गुरू पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आगामी नगरपालिका निवडणुकीमध्ये सध्याच्या नवनियुक्तीमुळे बदल घडेल, असा विश्वास मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर आणि जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे यांनी व्यक्त केला आहे.

या कार्यक्रमाला तालुका सचिव संदेश साळवी, सहकार सेना तालुका अध्यक्ष विनोद चिपळूणकर, सहकार शहर अध्यक्ष नितीन गोवळकर, स्वप्नील घारे, पंकज कुंभार, संतोष मठपती, साहिल गायकर आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button