क्रीडामुख्य बातमी

रत्नागिरीत रंगणार कुस्त्यांचा थरार

देशभरातील अव्वल ५० कुस्तीपटूंचा सहभाग

रत्नागिरी : उद्योगमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांच्या विधानसभा निवडणुकीच्या ऐतिहासिक विजयानिमित्त रत्नागिरीत देशभरातील नामांकित कुस्तीगिरांची कुस्त्यांची महादंगल रत्नागिरीत रंगणार असून आज १० जानेवारी ते ११ जानेवारी या दोन दिवसांत देशातील नावाजलेल्या ५० कुस्तीपटूंच्या कुस्त्यांचा रंगलेला फड रत्नागिरीकरांना पहायला मिळणार आहे.

रत्नागिरी जिल्हा मल्टिपल स्पोर्ट्‌स असोसिएशनच्यावतीने १० व ११ जानेवारी रोजी रत्नागिरीत अनोख्या कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले आहे. रत्नागिरीतील किंबहुना कोकणातील ही पहिलीच कुस्त्यांची स्पर्धा ठरणार आहे. या स्पर्धेत देशभरातील नावाजलेले कुस्तीपटू सहभागी होणार आहेत. रत्नागिरीतील उद्यमनगर येथील एम.डी. नाईक हॉलच्या मैदानात ही महास्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

देशातले नावाजलेले कुस्तीपटू या स्पर्धेत सहभागी होणार असून पहिला सामना महाराष्ट्र व भारत केसरी सिकंदर शेख विरुद्ध भारत केसरी दिल्लीचा कुस्तीपटू पैलवान भोला सिंग यांच्यात रंगणार आहे. तर दुसरी लढत महाराष्ट्र केसरी माऊली जगदाडे विरुद्ध पैलवान पंजाब केसरी जगदीप सिंह या दोघांमध्ये कोकणच्या लाल मातीत सामना रंगणार आहे. तिसरी लढत ही पुण्याचा महाराष्ट्र केसरी पैलवान बाळा रफीक शेख विरुद्ध दिल्लीचा पैलवान भारत केसरी बंटी कुमार यांच्यात जंगी लढत रत्नागिरीकरांना पहायला मिळणार आहे. उद्योगमंत्री उदय सामंत व आमदार किरण सामंत यांच्या विधानसभेतील महाविजयानिमित्त ही कुस्त्यांची महादंगल रत्नागिरीत रंगणार असून रात्रीच्यावेळी प्रकाशझोतात कोकणच्या लाल मातीत ही अनोखी स्पर्धा रंगणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button