मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा वृत्त
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या खेड तालुका अध्यक्षपदी गणेश बेलोसे यांची नियुक्ती

खेड : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार व खेड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा मनसे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष वाढीसाठी व संघटना बांधणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या खेड तालुका अध्यक्षपदी गणेश शिवाजी बेलोसे यांची नियुक्ती करण्यात आली.
या वेळी रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष संतोष नलावडे, जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे, खेड शहराध्यक्ष ऋषीकेश कानडे, भालचंद्र (नंदु) साळवी, सुरेश खेडेकर, मिलिंद (दादू) नांदगावकर, मनसे प्रसिध्दी माध्यम प्रमुख सर्वेश पवार, अक्षय जांभुळकर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.



