शिवसेनेतर्फे माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली

रत्नागिरी : तमाम शिवसैनिकांना मायेची सावली देणाऱ्या माय माऊली, माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या जयंती म्हणजेच ‘ममता दिनी’ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
शिवसेना सचिव आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या जनसंपर्क कार्यालयात ममता दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी माँसाहेबांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी उपजिल्हा प्रमुख शेखर घोसाळे, तालुकाप्रमुख बंड्याशेठ साळवी, उपतालुकाप्रमुख विजय देसाई, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, शहर संघटक प्रसाद सावंत, उपशहरप्रमुख नितिन तळेकर, विभागप्रमुख मयुरेश्वर पाटील, सलील डाफळे, अमित खडसोडे, शकील महालदार, धनंजय नलावडे, प्रशांत सुर्वे, उपविभाग प्रमुख प्रवीण सुर्वे, दिलावर गोदड तसेच बिपिन शिवलकर, मौला नदाफ, रवी जगताप, माजी नगरसेविका रशीदा गोदड, उपशहरप्रमुख विजया मामी घुडे, उन्नती कोळेकर, सेजल बोराटे, माजी नगरसेविका राजश्री शिवलकर, पूजा जाधव, सुवर्णा कडू, स्मिता काटकर-शिरधनकर, हिना दळवी, रमीजा तांडेल, रिहाना आदी शिवसैनिक उपस्थित होते.



