मुख्य बातमी
“डाएट”च्या नूतन प्रशासकीय इमारतीचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते शनिवारी लोकार्पण

रत्नागिरी : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट) तथा जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्था या कार्यालयाच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण उद्या (४ जानेवारी) दुपारी ३ वाजता उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते कुवारबाव येथे आयोजित करण्यात आले असल्याचे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुशील सुजाता सुरेश शिवलकर यांनी दिली.
यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, शालेय शिक्षण, गृह (ग्रामीण) राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज राज्यमंत्री योगेश कदम, खासदार सुनील तटकरे, खासदार नारायण राणे, आमदार निरंजन डावखरे, आमदार प्रसाद लाड, आमदार भास्कर जाधव, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार शेखर निकम, आमदार किरण सामंत यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.



