मुख्य बातमी

रास्तभाव धान्य दुकान परवान्यासाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

रत्नागिरी : जिल्ह्यातील रिक्त असलेल्या, राजीनामान्यने रिक्त झालेल्या व नव्याने मंजुरी देण्याच्या रास्तभाव धान्य दुकान व किरकोळ केरोसीन परवाने यासाठी आपल्या नजिकच्या तहसील कार्यालयात इच्छुकांनी ३१ जुलैपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत यांनी केले आहे.
मंडणगड तालुक्यात ९, दापोलीत १२, खेड ९, गुहागर १३, चिपळूण ९, संगमेश्वर २, रत्नागिरी ३, लांजा २, राजापूर १ असे एकूण ६९ असे एकूण रास्तभाव धान्य दुकान व किरकोळ केरोसीन परवाने मंजुरीसाठी जाहीरनामे काढण्यात आले आहेत. जाहीरनाम्यानुसार संबंधित तालुक्यातील इच्छुक ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था, नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गट, नोंदणीकृत सहकारी संस्था, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम किंवा संस्था नोंदणी अधिनियम या कायद्याच्या अंतर्गत नोंदणी झालेल्या संस्था व महिला स्वयंसहाय्यता बचत गट व महिलांच्या संस्था यांनी ३१ जुलै २०२४ पर्यंत संबंधित तहसीलदारांकडे आपले अर्ज सादर करावेत. अर्ज फी १० रुपये असून अर्जाचा नमुना तहसीलदार कार्यालयात उपलब्ध आहे.
मुदतीत व परिपूर्ण कागदपत्रांसह दाखल झालेल्या प्रस्तावांचाच विचार केला जाणार असून, मुदतीनंतर व अपुऱ्या कागदपत्रासह प्राप्त होणारे प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत यांची नोंद घ्यावी, असे श्रीमती रजपूत यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button