मुख्य बातमी
मंत्री उदय सामंत यांनी कोळंबे गावातील मुलांसोबत घेतला क्रिकेटचा आनंद

रत्नागिरी : आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढत उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी तालुक्यातील कोळंबे गावात मुलांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला.
गावातील खेळाडूंसोबत मैदानावर उतरून त्यांनी फलंदाजी करताना कौशल्याचे दर्शन घडवले. त्यांच्या फलंदाजीमुळे गावकऱ्यांमध्ये विशेष आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

या प्रसंगी मंत्री सामंत यांनी मुलांशी संवाद साधून खेळाच्या महत्त्वाबाबत चर्चा केली. त्यांनी मुलांना नियमित खेळण्यासाठी आणि त्यामधून आत्मविश्वास व संघभावना विकसित करण्यासाठी प्रोत्साहित केले.

खेळामुळे केवळ शरीरस्वास्थ्यच नाही, तर मानसिक आरोग्यही चांगले राहते, असेही त्यांनी नमूद केले. मुलांनीही त्यांच्या या सहभागाचे कौतुक करत भविष्यातील खेळाडूंना असेच प्रोत्साहन मिळावे, अशी इच्छा व्यक्त केली.



