मुख्य बातमी

रत्नागिरीकरांसाठी २१ दिवसीय मोफत योग शिबिराचे आयोजन 

रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रात पार पडणार योग शिबीर 

रत्नागिरी : नवीन वर्ष लवकरच सुरू होत आहे. या वर्षाची सुरुवात आरोग्यदायी करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक यांच्या भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्रात शहरातील नागरिकांसाठी मोफत योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबीर रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रातील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक योगभवनात होणार आहे. शिबिराचा कालावधी एकूण २१ दिवसांचा असून हे शिबीर १ जानेवारी ते २१ जानेवारी २०२५ दरम्यान दररोज सायंकाळी ५ वाजता होणार आहे. शिबीर मोफत असल्यामुळे आरोग्याची गुरुकिल्ली एक प्रकारे या शिबिरातून रत्नागिरीकरांना प्राप्त होणार आहे. इच्छुक नागरिकांनी या लिंकवर क्लिक करून आपली नोंदणी निश्चित करावी. तसेच ७७९८४९०६१५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button