मुख्य बातमी

ध्यानामुळे मानसिक समस्यांचे निर्मूलन शक्य : प्रा. अक्षय माळी

रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रात पहिला आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस साजरा

रत्नागिरी : ध्यानधारणेमुळे जीवन सुकर होते. इतकेच नाही कोलाहल, गोंधळ आणि धकाधकीच्या स्थितीत मनाला एकाग्र आणि स्थिर करण्यात ध्यान उपयोगी पडते. म्हणून ध्यान धारणा अंगिकारल्याने मानसिक समस्या दूर होतात, असे प्रतिपादन प्रा. अक्षय माळी यांनी केले. ते पहिल्या आंतरराष्ट्रीय ध्यान दिवसाच्या कार्यक्रमात बोलत होते.

कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ यांचे भारतरत्न डॉ पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्र येथे जागतिक ध्यान दिवसाच्या निमित्ताने ओंकार ध्यान विषयावर प्रा. अक्षय माळी यांनी उपस्थित योग साधकांना मार्गदर्शन केले. २१ डिसेंबर रोजी प्रथम आंतरराष्ट्रीय ध्यान दिवसाचे औचित्य साधत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ध्यानाचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.

यावेळी विद्यार्थी व योग साधक आणि उपकेंद्रातील प्राध्यापक व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button