मुख्य बातमी

आमदार उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध उपक्रम

रत्नागिरी : राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरीमध्ये विविध कार्यक्रम करण्यात आले आहे. सर्वप्रथम ग्रामदैवत भैरी चरणी साहेबांना उदंड आयुष्य मिळावे म्हणून अभिषेक व प्रार्थना करण्यात आली.

त्यानंतर शाळा क्रमांक ८ येथे विभागप्रमुख बाळू गांगण व बाबा चव्हाण यांच्या वतीने बालवाडीतील मुलांना खेळण्याचे साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.

चंपक मैदान येथे असलेल्या गोशाळेला औषध व खाद्य देण्यात आली. त्यानंतर आशादीप येथील संस्थेमधील मुलांना गरजेचे साहित्य व धान्य देण्यात आले. त्याचप्रमाणे माहेर येथील संस्थेतील मुलांना जीवनावश्यक वस्तू व साहित्य देण्यात आले.

याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडीत, शिवसेना शहरप्रमुख बिपीन बंदरकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजन शेट्ये, विभागप्रमुख राहुल रसाळ, नगरसेवक बंटी कीर, नगरसेवक राकेश नागरेकर, नगरसेवक विकास पाटील, युवासेना शहरप्रमुख अभिजीत दुडे, विभाग प्रमुख बाळू गांगण, शाखाप्रमुख राहुल पिलणकर, स्वप्नील मयेकर, शशिकांत आलीम, संघटक मनीषा बामणे, शहर संघटक सौरव मलुष्टे, उपशहरप्रमुख बावा चव्हाण, विभागप्रमुख मनोज साळवी, नगरसेविकास श्रद्धा हळदणकर, संजय हळदणकर, नगरसेवक सोहेल मुकादम, जकी खान, विभागप्रमुख संजय नाईक उपविभाग प्रमुख आशु मोरे बंटी गुरव, उपविभाग प्रमुख सुनील शिवलकर, विभाग प्रमुख दीपक पवार, राजेश आराध्यमठ, नरेंद्र देसाई, सुनील कीर, दुर्वेश पांगम, निधी शिवलकर, आप्पा पुनसकर, प्रसन्ना पिलणकर, संतोष शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button