मुख्य बातमी
स्वगृही सेवा संस्था वृद्धाश्रमाला धान्य व जीवनावश्यक वस्तूंची देणगी
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी शहर शिवसेनेचा उपक्रम

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी शहर शिवसेनेच्या वतीने शहराजवळील शिरगाव येथील स्वगृही सेवा संस्था या वृद्धाश्रमामध्ये धान्य व जीवनावश्यक वस्तूंचा साठा पुरवण्यात आला.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, शहरप्रमुख बिपीन बंदरकर, महिला शहरप्रमुख स्मितल पावसकर, महिला तालुकाप्रमुख कांचन नागवेकर, नगरसेविका दिशा साळवी, श्रद्धा हळदणकर, शहर संघटक सौरभ मलुष्टे, शहर महिला संघटक पूजा पवार, युवा सेनेचे दुर्वेश पांगम, राजेश आराध्यमठ, पप्पू सुर्वे, उपशहरप्रमुख सुहासिनी भोळे, शाखाप्रमुख अविनाश भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.



