मुख्य बातमी

अखिल मराठा महासंमेलनासाठी हजारो मराठा बंधू-भगिनी येणार

१८- १९ जानेवारीला रत्नागिरीत आयोजन

रत्नागिरी : अखिल मराठा फेडरेशनने १८ व १९ जानेवारी २०२५ रोजी येथे हॉटेल विवेक येथे अखिल मराठा महासंमेलन आयोजित केले आहे. देशातील ५५ मराठा मंडळांचे दोन हजारांहून अधिक प्रतिनिधी यात सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाचे सहआयोजक येथील मराठा मंडळ आणि क्षत्रिय मराठा मंडळ आहे. संमेलनाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नारायण राणे यांच्यासह ॲड. सतीश माने-शिंदे, इंद्रजीत सावंत, प्रज्वल चव्हाण, विश्वास नांगरे पाटील, वैशाली जोंधळे, सुरेश हावरे, उज्ज्वल साठे अशा अनेक नामवंत व्यक्ती रत्नागिरीत येणार आहेत, अशी माहिती विवा एक्झिक्युटीव्ह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.

यावेळी क्षत्रिय मराठा मंडळाचे कार्याध्यक्ष राकेश नलावडे, उपाध्यक्ष प्राची शिंदे, प्रचारप्रमुख संतोष तावडे, सल्लागार सतीश साळवी, मराठा मंडळाचे अप्पा देसाई आणि सचिव प्रताप सावंतदेसाई उपस्थित होते.

पाहुण्यांची निवास व भोजन व्यवस्था, मनोरंजनपर कार्यक्रम, उद्बोधक परिसंवाद, व्याख्याने, उद्योजकांच्या मुलाखती यांचे आयोजन केले आहे. हे महासंमेलन यशस्वी होण्यासाठी क्षत्रिय मराठा मंडळ व मराठा मंडळाचे पदाधिकारी, महिला, तरुण, ज्येष्ठ नियोजन पद्धतीने मेहनत घेत आहेत. मराठा समाजाच्या प्रगतीसाठी विचारमंथन, समाजजागृती व विविध उपक्रमांसाठी या महासंमेलनाचे विशेष महत्त्व आहे. मराठा समाजाची शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक उन्नती झाली पाहिजे. असा दृष्टिकोन समाजामध्ये निर्माण व्हावा तसेच समाजामध्ये स्वाभिमान जागृत करून समाजाला स्वावलंबी बनवून आपल्या भारत देशाला जागतिक स्तरावर आर्थिक महासत्ता म्हणून पुढे आणण्यासाठी आपल्या मराठा समाजाचा सिंहाचा वाटा असला पाहिजे. ही प्रेरणा घेऊन समाजाला परिवर्तनवादी दिशा दाखवताना आपला देश, धर्म, संस्कृती, रूढी, परंपरा यांचा वारसा जतन करीत मराठा समाजाने डोळसपणे पुढे वाटचाल केली पाहिजे. अशा उद्दात विचारांचे चर्चासत्रांच्या माध्यमातून आदान प्रदान करणे, हा या महासंमेलनाचा मुख्य हेतू आहे.

अखिल मराठा फेडरेशनची स्थापना २०१५ साली स्वर्गीय आप्पासाहेब पवार यांनी मराठा समाजासाठी विविध भागात काम करणाऱ्या आणि महाराष्ट्रात विविध ठिकाणी समाज कार्य करणाऱ्या मराठा संस्थांना एकत्र करून त्याचे फेडरेशन तयार केले. या संमेलनाच्या निमित्ताने मराठा जोडो’ हे अभियान सर्व मराठा मंडळ, संस्था जोरदारपणे राबवतील असा विश्वास फेडरेशनला वाटत आहे. भविष्यात मराठा विध्यार्थ्यांनी शिक्षण क्षेत्रात प्रगती करताना येणाऱ्या अडचणी कशा दूर कराव्यात यावर सुद्धा विचार मंथन होईल. मराठा व्यावसायिकांनी आर्थिक क्षेत्रात योग्य दिशेने प्रगती कशी करावी या संदर्भात मार्गदर्शन होईल.

या संमेलनाला देशभरातून, महाराष्ट्रातून मराठे येणार असूनस्यांच्या स्वागताला रत्नागिरीतील क्षत्रिय मराठा मंडळ आणि मराठा मंडळ रत्नागिरी तसेच गावागावातील मराठा मंडळ स्वागताच्या जय्यत तयारीला लागलेले दिसून येत आहेत. या संमेलनाच्या प्रचारासाठी गावागावातून बैठका घेण्याचे सत्र चालू झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मराठा समाजामध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातवरण दिसून येत आहे. विशेष म्हणजे या संमेलनाला सर्वच मराठा आमदार, पुढारी, नेते सहभागी होणार आहेत. विशेष प्राविण्य मिळवलेले तसेच यशाच्या शिखरावर पोहचलेले मराठा बांधव आणि भगिनी ह्या सोहळ्याला मार्गदर्शन करणार आहेत.

कार्यक्रमाची रूपरेषा आखताना येणाऱ्या पाहुण्यांची निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था आणि मनोरंजनपर कार्यक्रम आखून दोन दिवस चालणाऱ्या या महासंमेलनाचे खूप काळजीपूर्वक नियोजन केलेले दिसून येत आहे. सकाळी ९ वाजता न्याहारी आणि नोंदणी असेल. १० वाजता मुख्य उद्घाटन होऊन दुपारी भोजन, विश्रांती चर्चासत्र, संध्याकाळी चहापान, महिलांचा गौरव, मनोरंजन आणि रात्रीच्या भोजनाने पहिला दिवस संपेल. पुन्हा दुसन्या दिवशी सकाळी ९ वाजता न्याहारी, चर्चासत्र, दुपारी भोजनानंतर संध्याकाळी विशेष समारोपाने या महासंमेलनाचा सांगता होईल.

हे महासंमेलन यशस्वी होण्यासाठी क्षत्रिय मराठा मंडळ आणि मराठा मंडळ रत्नागिरीचे पदाधिकारी, महिला भगिनी, तरुण वर्ग, ज्येष्ठ मंडळी अतिशय नियोजन पद्धतीने कठोर परिश्रम आयोजकांच्या वतीने मोठ्या संख्येने सर्व मराठा बांधव राहण्याचे आवाहन अखिल मराठा फेडरेशनचे घेताना दिसत आहेत. भगिनींनी कार्यक्रमाला पूर्णवळ उपस्थित अध्यक्ष सुरेशराव सुर्वे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button