राष्ट्रीय व्हॉलिबॉल क्रीडा स्पर्धेसाठी २६ डिसेंबरला खेळाडूंनी राहावे
प्र. जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचे आवाहन : पुणे येथे आयोजन

रत्नागिरी : वरिष्ठ गट राष्ट्रीय व्हॉलिबॉल अजिंक्यपद क्रीडा स्पर्धा २०२५ खुल्या राज्य निवड चाचणी चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय, गुलटेकडी, पुणे- ४११०३७ येथे २६ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता होणार आहे. जिल्ह्यातील वरिष्ठ गटातील इच्छुक खेळाडूंनी या ठिकाणी सकाळी ८ वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन प्र. जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी केले आहे.
वरिष्ठ गट राष्ट्रीय व्हॉलिबॉल अजिंक्यपद क्रीडा स्पर्धा २०२५ खुल्या राज्य निवड चाचणीबाबत राष्ट्रीयस्तरावर व्हॉलिबॉल या खेळप्रकारातील अधिकृत एकविध खेळ संघटना कार्यरत नाही. त्यामुळे भारतातील व्हॉलिबॉल खेळाच्या प्रसार व प्रचाराचे काम सुरळीत राहावे यासाठी इंडियन ऑलिंपिक असोशिएशनद्वारा ॲडहॉक समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. ॲडहॉक कमिटी व्हॉलिबॉल फेडरेशन ऑफ इंडिया यांच्याद्वारा ७ ते १३ जानेवारी २०२५ या कालावधीत जयपुर, राजस्थान या ठिकाणी सन २०२५ मधील वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रस्तावित राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्य संघाची निवड करण्याची जबाबदारी आयोजन समितीस देण्यात आलेली आहे.
या निवड चाचणीदरम्यान निवास व भोजनाची व्यवस्था खेळाडूंनी स्वतः करायची आहे, व्हॉलिबॉल खेळाच्या खेळाडूंना (पुरुष/महिला) उक्त निवड चाचणीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन क्रीडा व युवक सेवा पुणे विभागाच्या उपसंचालकांनी केले आहे.



