मुख्य बातमीशैक्षणिक
नवनिर्माण महाविद्यालयात कॉमर्स प्रदर्शन

संगमेश्वर : येथील नवनिर्माण महाविद्यालयात कॉमर्स प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी प्राचार्या डॉ. संजना चव्हाण, किरण गुरव, पूजा बोथरे, मितेश पवार, रूपाली अणेराव आदी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी कॉमर्ससंदर्भात माहिती देणारे पोस्टर आणि त्यांची सुसज्ज माहिती दिली. सर्व विद्यार्थिनींनी कॉमर्स संदर्भात रांगोळी काढण्यात आल्या. या प्रदर्शनात बँकिंगच्या संदर्भात लागणारी डॉक्युमेंट्स आदी विविध माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे भांडवल बाजार, नाणे बाजार यांची ही सविस्तर माहिती देऊन याचा परिचय विद्यार्थ्यांना करून देण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईशा शेरे हिने केले.




