मुख्य बातमी

लायन्स क्लब रत्नागिरी आणि मिरजोळे ग्रामपंचायतीमार्फत पाडावेवाडी येथे वनराई बंधारा

रत्नागिरी : लायन्स क्लब रत्नागिरी तसेच मिरजोळे ग्रामपंचायत यांच्यामार्फत “पाणी आडवा, पाणी जिरवा” या संकल्पनेतून आज (१४ डिसेंबर) पाडावेवाडी येथे मातीचा बंधारा बांधण्यात आला.

या ठिकाणी असणाऱ्या नैसर्गिक झऱ्याचे पाणी लोकांच्या उपयोगासाठी वापरण्यात यावे या हेतूने लायन्स क्लब आणि मिरजोळे ग्रामपंचायतीच्या सहयोगातून हा बंधारा घालण्यात आला. उन्हाळ्यात होणारी पाण्याची कमतरता या बंधाऱ्यामुळे कमी होईल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.

हा बंधारा बांधण्यासाठी व श्रमदान करण्यासाठी लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन गणेश धुरी, ला. साक्षी धुरी, सचिव ला. विशाल ढोकळे, खजिनदार ला. अमेय विरकर, ला. ललिता, ला. शरद नागवेकर, ला. संजीव जैन, ला. प्रसाद माने, लिओ अध्यक्ष श्रेयस रसाळ, त्याचप्रमाणे मिरजोळे चे सरपंच श्री. पाटील, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासह पाडावेवाडीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लायन्स क्लबच्या या उपक्रमाबद्दल ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्याकडून विशेष कौतुक करण्यात आले. तसेच अध्यक्ष व सर्व क्लब मेंबरचा सन्मान यावेळी ग्रामपंचायतीकडून करण्यात आला. श्रमदान करणाऱ्या सर्व ग्रामस्थ व कर्मचाऱ्यांना पोहे व चहाची व्यवस्था करण्यात आली होती. सरपंच श्री. पाटील यांनी लायन्स क्लबचे विशेष आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button