मुख्य बातमी

आमदार उदय सामंत आज जिंदाल पोर्टला भेट देणार 

रत्नागिरी : तालुक्यातील जयगड येथील जिंदल पोर्टच्या टँकर पार्किंग प्लांटमधील इथील मरकॅप्टन वायूची गळती झाल्यामुळे वीस मीटर अंतरावर असलेल्या माध्यमिक विद्यालय जयगडमधील विद्यार्थी बाधित झाले होते. ही घटना काल (१२ डिसेंबर) घडली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार उदय सामंत आज सकाळी ११ वाजता जयगड येथे भेट देणार आहेत.

काल दुपारी जिंदल पोर्टच्या टँकर पार्किंग प्लांटमधील इथील मरकॅप्टन वायूची गळती झाली. या प्रकारामुळे प्लांटच्या जवळच असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना मळमळ, पोटदुखीचा त्रास तसेच चक्कर यांसारखी लक्षणे दिसायला लागली. मुलांना त्रास होऊ लागल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी वाटद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासह रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. काही मुलांना उपचार करून सोडण्यात आले होते. तर काही मुलं अद्यापही शासकीय रुग्णालयात दाखल असून उपचार घेत आहेत.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर आमदार उदय सामंत आज ११ वाजता जयगड येथील जिंदल पोर्टला भेट देणार असून, कंपनी प्रशासनाशी यासंदर्भात चर्चा केली जाणार आहे.

दरम्यान या घटनेमुळे पालक वर्ग आक्रमक झाला असून कंपनीचा प्लांट बंद करण्यासाठी मागणी पालकांसह जयगड पंचक्रोशीतून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आमदार सामंत यांची आजची भेट महत्त्वाची ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button