मुख्य बातमी

जिल्हा रुग्णालयात ३६ विद्यार्थ्यांवर उपचार सुरू

दोन विद्यार्थिनी खाजगी रुग्णालयात दाखल; विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर

रत्नागिरी : तालुक्यातील जयगड येथील जिंदाल हायस्कूल मध्ये एलपीजी वायुगळतीची दुर्घटना झाली असून, अनेक मुलांना याची बाधा झाली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी घटनास्थळी हजर झाले आहेत. अनेक मुलांना तबडतोब उपचार सुरू झाले आहेत.

याबाबत जिल्हा प्रशासन आणि दिलेली माहिती अशी : आज (१२ डिसेंबर) दुपारी २.३० ते ३ वाजण्याच्या सुमारास माध्यमिक विद्यालय जयगड येथील शाळेत एलपीजी वायुचा वास पासरल्याने शाळेतील काही विद्यार्थ्यांना मळमळ, पोटदुखीचा त्रास झाला आहे.

त्रास झालेल्या विद्यार्थ्यांपैकी ८ विद्यार्थी वाटद प्राथमिक आरोग्य केंद्रात ,तर २ विद्यार्थी जयगड येथील ऊर्जा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उर्वरित २२ विद्यार्थ्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी आणण्यात आले आहे. येथे पाठविण्यात आलेले आहे. सद्या ३६ विद्यार्थी जिल्हा रुग्णालयात दाखल असून २ विद्यार्थी परकार रुग्णालयात दाखल झाले आहेत. सर्व विद्यार्थी यांची प्रकृती स्थिर आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button