
रत्नागिरी : तालुक्यातील जयगड येथील जिंदाल हायस्कूल मध्ये एलपीजी गॅस दुर्घटना झाली असून, अनेक मुलांना याची बाधा झाली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी घटनास्थळी हजर झाले आहेत. अनेक मुलांना तबडतोब उपचार सुरू झाले आहेत.

नक्की दुर्घटना कशी घडली याची पूर्ण माहिती पोलीस प्रशासनाने अजून दिली नाही. तर प्राथमिक आरोग्य केंद्रातून माहिती उपलब्ध झाली नाही. शाळा प्रशासनाने जेवणातून विष बाधा झाल्याचे सांगितले असून, प्रत्यदर्शी मात्र एलपीजी गॅस गळती झाल्याचे सांगत आहेत.





