मुख्य बातमी

कोकण रेल्वे मार्गावर ८ डिसेंबरपासून धावणार फेस्टिवल स्पेशल गाडी

रत्नागिरी : अहमदाबाद ते थिवी अशी कोकण रेल्वे मार्गे धावणारी विशेष फेस्टिवल स्पेशल गाडी दिनांक ८ डिसेंबर २०२४ ते १ जानेवारी २०२५ या कालावधीत चालविण्यात येणार आहे.

यासंदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार ख्रिसमसमुळे कोकण रेल्वे मार्गावर वाढणारी गर्दी लक्षात घेऊन विशेष गाडीचे नियोजन करण्यात आले आहे. ८ डिसेंबर २०२४ ते २ जानेवारी २०२५ या कालावधीत आठवड्यातून दोनदा ही गाडी धावणार आहे.

अहमदाबाद येथून ही गाडी (०९४१२) रविवार तसेच बुधवारी दुपारी २ वाजून १० मिनिटांनी सुटेल आणि गोव्यात थिवी स्थानकावर ती दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी (०९४११) ठथिवी येथून सकाळी ११ वाजून ४० मिनिटांनी सुटेल आणि अहमदाबादला ती दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजून ४५ मिनिटांनी पोहोचेल.

फेस्टिवल स्पेशल गाडीचे थांबे

आनंद, वडोदरा, भरूच, उधना, वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, कुडाळ, व सावंतवाडी.

एकूण १५ एलएचबी डब्यांची ही गाडी धावणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button