मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा वृत्त

देवरूख येथील श्री सद्गुरु लोकमान्य वाचनालयातर्फे खुल्या लेख स्पर्धेचे आयोजन

देवरूख : येथील श्री सद्गुरु लोकमान्य वाचनालयाने माजी ग्रंथपाल स्व. ल. वा. साने गुरुजी यांचे स्मरणार्थ ७ व्या खुल्या लेख स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेसाठी खालील दोन विषय निश्चित करण्यात आले आहेत.

‘दिसामाजी काहीतरी लिहावे, प्रसंगी अखंडित वाचीत जावे’ आणि ‘धर्मनिरपेक्षता आणि सर्वधर्मसमभाव… अपेक्षा आणि वास्तव’ दोन्ही विषयातील लेखांसाठी प्रथम तीन क्रमांकांना १०००, रुपये ७५० आणि रुपये ५०० अशी प्रथम तीन बक्षिसे आणि प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या लेखासाठी शब्द मर्यादा किमान १२०० शब्द आणि कमाल १५०० शब्द अशी आहे.

लेख पाठविण्याची अंतिम तारीख २५ सप्टेंबर २०२४ ही आहे. या स्पर्धेविषयीच्या अधिक माहितीसाठी (९४२३२९७३५८) या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन अध्यक्ष, श्री सद्गुरू लोकमान्य वाचनालय, देवरूख यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button