मुख्य बातमी

मारुती मंदिर शिवसृष्टीमधील मावळांच्या पुतळ्यांच्या विटंबनप्रकरणी तरुण ताब्यात

नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे रत्नागिरी पोलीस दलाचे आवाहन

रत्नागिरी : शहरातील मारुती मंदिर येथील शिवसृष्टीमधील मावळांच्या पुतळ्यांचे नुकसान प्रकरणी शहर पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतले असून, शहर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध सार्वजनिक संपत्तीस हानी प्रतिबंध अधिनियम १९८४ चे कलम ३(१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. संदेश गावडे (वय २४ वर्ष, रत्नागिरी) असे त्या तरुणाचे नाव आहे.

आज (२ सप्टेंबर) रोजी विभागीय गस्ती दरम्यान रात्री २.३२ वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गस्त घालत असणाऱ्या सेकंड मोबाईलमधील पेट्रोलिंग अंमलदार यांना मारुती मंदिर येथील असणाऱ्या शिवसृष्टीमधील मावळांच्या पुतळ्यांची एका इसमाने नुकसान केले आहे, असे समजताच सेकंड मोबाईल मधील पेट्रोलिंग अंमलदार यांनी त्या तरुणाला हटकले. हा तरुण मारुती मंदिर येथून बस स्थानकाच्या दिशेने पळून गेला होता.

या घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याची सेकंड मोबाईल पेट्रोलिंग व सेक्टर अंमलदार यांच्या मदतीने आठवडा बाजार येथून त्या तरुणाला तत्काळ ताब्यात घेतले. संदेश गावडे याच्याविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात रजिस्टर नंबर ३३२/२०२४ सार्वजनिक संपत्तीस हानी प्रतिबंध अधिनियम १९८४ चे कलम ३(१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. संदेश गावडे हा रत्नागिरी शहरामधील रहिवासी असल्याचे प्राथमिक चौकशीमध्ये पुढे आले आहे. या घटनेची अधिक चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, संदेश गावडे याला आज न्यायालयात पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी हजर केले जाणार आहे.

घटेनेचे गांभीर्य लक्षात घेता नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवण्यात येऊ नये अथवा अफवांचे बळी पडू नये, असे आवाहन रत्नागिरी पोलीस दलातर्फे आवाहन आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button